महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा प्रत्यक्षात सादर केल्याच्या तुलनेत सुधारीतमध्ये वाढता वाढता वाढे..

सन २०२१- २२नंतरच सुधारीतच्या नावावर वाढवला गेला अर्थसंकल्पाचा फुगा


मुंबई(सचिन धानजी) - मुंबई महापालिकेचे आजवर जेवढे अंदाजित अर्थसंकल्प मांडले गेले, ते अर्थसंकल्प सुधारीत करताना त्याचा प्रत्यक्षात आकार कमी झालेला पहायला मिळत होता, परंतु आता मागील सन २०२१-२२ पासून प्रत्यक्षात सादर केलेल्या अंदाजित अर्थसंकल्पाच्या तुलनेत सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा वाढलेला पहायला मिळत आहे. चालू अर्थसंकल्पाचा आकडा सादर करताना ५९,९५४.७५ कोटी रुपये जाहीर केला होता, परंतु प्रत्यक्षात तो आकडा ६५,१८०.७९ कोटींवर वाढवण्यात आला. मात्र, याच अर्थसंकल्पाचा आकडा सुधारीत करताना ही रक्कम ६४,२३८ कोटी रुपये एवढी दर्शवली गेली.


त्यामुळे प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत दाखवल्या गेलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा सुमारे ५ हजार कोटींनी जास्त आहे आणि सुधारीत पेक्षा ४३०० कोटींनी जास्त असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या आकड्याच्या तुलनेत सुधारीत केलेले आकडे वाढता वाढता वाढतच जात असल्याचे पहायला मिळत आहे.


मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी सन २०२५-२६चा अर्थंसकल्पीय अंदाज सादर केला. या सन २०२५ २६ या आर्थिक वर्षांत ७४,४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. सन २०१६- १७ पासून ते सन २०२०- २१ या कालावधीमध्ये प्रत्यक्षात आयुक्तांनी सादर केलेले अर्थसंकल्प आणि सुधारीत केलेल्या अर्थसंकल्पात तफावत दिसून आली आहे. प्रत्यक्ष सादर केलेल्या अर्थसंकल्पातील रकमेपेक्षा सुधारीत केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत होते.



परंतु सन २०२१- २२ पासून प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा हा सुधारीत पेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा वाढतच आहे. उलट प्रत्यक्षात आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील आकडा आणि प्रत्यक्षात त्यानंतर दाखवलेला आकडा आणि त्यानंतर सुधारीत केलेल्या अर्थसंकल्पाची आकडेवारी वेगवेगळीच पहायला मिळत आहे.


सन २०२१- २२मध्ये आयुक्तांनी २७,८११ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला, परंतु त्यानंतर या अर्थसंकल्पाचा आकडा ३९,०३८.८३ कोटी रुपये दर्शवला गेला. त्यातून मग हे अर्थसंकल्प सुधारीत करताना याचा आकडा ३९,६१२.७७ कोटी रुपये केले गेले. म्हणजे प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकड्यापेक्षा दाखवलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा ११,२२७ कोटींनी अधिक होता आणि सुधारीत अर्थसंकल्पात तो ११,८०१ कोटींनी अधिक वाढला गेला.


त्यानंतर पुढील वर्षी सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा कमी झाला आणि सन २०२३-२४मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा ५२,६१९ कोटी रुपयांच्या तुलनेत दाखवल्या गेलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा ५४,२५६.०६ कोटी रुपये होता आणि सुधारीतमध्ये ही रक्कम ५,०११.६० कोटी रुपये दर्शवली गेली. तर सन २०२४- २५मध्ये प्रत्यक्षात सादर केलेल्या ५९,९५४.७५ कोटी रुपये अर्थसंकल्पाच्या तुलनेत दाखवलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा पाच हजार कोटींनी जास्त होता आणि सुधारीतमध्ये तो ६४,२३८ कोटी रुपये केला गेला.



मागील नऊ वर्षातील मांडलेला अर्थसंकल्प अंदाज आणि सुधारीत केलेला अर्थसंकल्प


सन २०१६-१७ मध्ये सादर अर्थसंकल्प : ३७,०५२.५२ कोटी रुपये


सुधारित अर्थसंकल्प: २४,७७७.१० कोटी रुपये



सन २०१७-१८ मध्ये सादर अर्थसंकल्प : २५,१४१.५१ कोटी रुपये


सुधारित अर्थसंकल्प: २१,९७८.३४ कोटी रुपये



सन २०१८-१९मध्ये सादर अर्थसंकल्प : २७,२५८.०७ कोटी रुपये


सुधारित अर्थसंकल्प: २२४५६ ५९ कोटी रुपये



सन २०१९-२० मध्ये सादर अर्थसंकल्प : ३०,६९२.५९ कोटी रुपये


सुधारित अर्थसंकल्प: २२,४३५.१२ कोटी रुपये



सन २०२०- २०२१मध्ये सादर अर्थसंकल्प : २८,४८८.३० कोटी रुपये


सुधारित अर्थसंकल्प: २२,५७२.१३ कोटी रुपये



सन २०२१-२२ मध्ये सादर अर्थसंकल्प : २७,८११ कोटी रुपये


दाखवला गेला : ३९०३८.८३ कोटी रुपये


सुधारितअर्थसंकल्प: ३९६१२.७७ कोटी रुपये



सन २०२२-२३ मध्ये सादर अर्थसंकल्प : ४५,९४९.२१ कोटी रुपये


दाखवला गेला : ४५,९४९.२१कोटी रुपये


सुधारीत अर्थसंकल्प : ४३,६०७. १० कोटी रुपये



सन २०२३-२४ मध्ये सादर अर्थसंकल्प : ५२,६१९.०७ कोटी रुपये


दाखवला गेला : ५४,२५६.०७ कोटी रुपये


सुधारीत अर्थसंकल्प : ५०,०११.६० कोटी रुपये



सन २०२४-२५ मध्ये ५९,९५४.७५ कोटी रुपये


दाखवला गेला : ६५१८०.७९


सुधारीत अर्थसंकल्प : ६४,२३८ कोटी रुपये

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा