एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती

मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहे.एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल करण्यात आला आहे. महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद समोर आला होता. त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती.


आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागानं राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांच्याकडे देण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं अध्यक्षपद यापूर्वी परिवहन मंत्र्यांकडे असायचे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात नियमात बदल करुन भरत गोगावले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटीचं स्टेअरींग होतं. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयानं प्रताप सरनाईक यांना धक्का बसला आहे.

राज्यात महायुती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करुन एसटीचं अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आलं होतं. एसटीच्या उत्पन्नवाठीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच कर्नाटक राज्याचा दौरा केला होता. आता एसटी महामंडळाचं अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं आहे.त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयामुळे महायुतीत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.