Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीAC e-Bus : टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार १०० एसी ई बसेस!

AC e-Bus : टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार १०० एसी ई बसेस!

नवी दिल्ली : ‘पीएम ई बस सेवा’ (PMP e-Bus) योजने अंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या (Thane Municipality) परिवहन सेवेसाठी १०० पर्यावरणपुरक वातानुकूलीत ई बसेस मंजूर केल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात या बसेस टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

Tamilnadu : धक्कादायक! तीन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते. परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसेच आगारांच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले.

प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या १०० वातानुकूलीत आरामदायी ई बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे प्रथम आभार मानले. तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात ५ रु. वाढ म्हणजेच २४ प्रति किलोमीटर ऐवजी रु.२९ प्रति किलोमीटर इतके अनुदान देण्याची तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता २०० किलोमीटरवरून १६० किलोमीटरपर्यंत कमी करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल ठरेल असे बैठकीत त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ठाणे परिवहन सेवेला जसे केंद्र शासन सहकार्य करत आहे तसेच देशातील अन्य राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना सहकार्य करावे, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. म्हस्के यांच्या सूचनेचे बैठकीला उपस्थित अन्य खासदारांनी स्वागत केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -