Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या(Delhi Assembly Election 2025) ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या, १९ हजार होमगार्ड आणि ३५ हजार ६२६ पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच मतदानासाठी २१ हजार ५०० हून अधिक मतपत्रिका युनिट्स आणि व्हीव्हीपॅट तयार करण्यात आले आहेत.


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, या तिन्ही पक्षांनी त्यांचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील जनतेला विविध मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १३ हजार ७६६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.


दिल्लीत ८३.७६ लाख पुरुष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी ७३३ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुका खूप रोमांचक असल्याचे म्हंटले जात आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवणारा आम आदमी पक्ष यावेळी हॅट्रिकचे आश्वासन देत आहे, तर भाजपचा दावा आहे की त्यांचा पक्ष यावेळी केंद्रशासित प्रदेशात सत्ता काबीज करेल. यावेळी भाजप आणि आम आदमी पक्षाने अनेक पक्षांतरितांना तिकिटे दिली आहेत.



दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर काही काळानंतर, विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्था दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध करतील.


दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६२ विधानसभा जागा जिंकल्या तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना