वॉशिंग्टन डी. सी. : मध्य आशियातील तणाव निवळावा आणि परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी अमेरिका गाझाचा ताबा घेईल. सुरक्षेचा विचार करुन गाझातील नागरिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या घोषणेचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वागत केले. अमेरिकेची घोषणा प्रत्यक्षात आल्यास इतिहास बदलेल; असेही बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
“The U.S. will take over the Gaza Strip, and we will do a job with it, too.” –President Donald J. Trump pic.twitter.com/aCqLl9Gwwn
— President Donald J. Trump (@POTUS) February 5, 2025
टोरेस घोटाळ्यात सहभागी युक्रेनच्या अभिनेत्याने बनावट जन्मदाखला करुन घेतल्याचे उघड
गाझात शांतता राहावी आणि गाझा पट्टी इस्रायलच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू नये यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावाचे इस्रायल मनापासून स्वागत करत असल्याचे बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. ट्रम्प यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात आल्यास गाझा पट्टीच्या इतिहिसात एक नवा अध्याय लिहिला जाईल; असेही बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण
हमास आणि त्यांच्या समर्थकांनी इस्रायलच्या अनेक नागरिकांना स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. या नागरिकांची सुखरुप सुटका करावी आणि त्यांना इस्रायल सरकारच्या ताब्यात द्यावे. गाझा पट्टीत शांतता निर्माण करण्यासाठी हमासची ही कृती सहाय्यक ठरू शकते, असे बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. इस्रायलच्या सीमांवर शांतता नांदावी एवढीच माफक इच्छा असल्याचे बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले.
ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गेले होते. या भेटीत नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यात गाझातील परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेअंती ट्रम्प यांनी गाझा संदर्भात नवा प्रस्ताव जाहीर केला आहे.