
बंगळूरू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कारला एका लोडिंग रिक्षाची धडक बसली. त्यानंतर राहुल द्रविड आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : मुंबईत चेंबुर परिसरात बेस्ट बस आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळी १० वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास चेंबुर येथील ...
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल बंगळुरूतील हाय ग्राऊंड्स वाहतूक पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. काल सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास राहुल द्रविड कारने इंडियन एक्स्प्रेस सर्कलवरून हाय ग्राऊंडकडे निघाला होता. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्याचेवळी लोडिंग रिक्षा राहुल द्रविडच्या कारला येऊन धडकला. त्यानंतर राहुल द्रविड आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला.या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.
या व्हिडिओमध्ये रिक्षाच्या धडकेमुळे कारचे नुकसान झाल्याचे राहुल द्रविड रिक्षाचालकाला सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. यासंदर्भात कोणत्याही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. (Rahul Dravid)
View this post on Instagram