मुंबई : मुंबईत चेंबुर परिसरात बेस्ट बस आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळी १० वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास चेंबुर येथील अण्णाभाऊ साठे उद्यान/सुमन नगर येथे ही घटना घडली. माहुल येथून वांद्रे स्टेशन येथे जाणाऱ्या बेस्ट बसचा अपघात झाला. तसेच यामध्ये बसचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai News)
PM Narendra Modi : महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींचं अमृतस्नान!
या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram