Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदी आज महाकुंभ दौऱ्यावर, संगमामध्ये करणार पवित्र स्नान

पंतप्रधान मोदी आज महाकुंभ दौऱ्यावर, संगमामध्ये करणार पवित्र स्नान

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी प्रयागराज दौऱ्यावर असतील. या दरम्यान, तेथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये पोहोचल्यावर संगमामध्ये पवित्र स्नान करणार आहेत. पंतप्रधान यांच्या दौऱ्याआधी सर्व व्यवस्था कडकोट करण्यात आली आहे. मेळ्यामधील सुरक्षा पाहता एसपीजीने मोर्चा हाती घेतला आहे. सोबतच एअर, वॉटर फ्लीट आणि रोड फ्लीट रिहर्सल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींसह दोन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह उत्तर प्रदेश सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित राहतील.

१३ जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत १४ कोटीहून अधिक लोकांनी पवित्र स्नानाचा आनंद घेतला आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह बड्या नावांचा समावेश आहे. याशिवाय अनेक देशांच्या प्रतिनिधींनीही महाकुंभमध्ये स्नानाचा आनंद घेतला आहे.

१० वाजता पंतप्रधान मोदी प्रयागराज एअरपोर्टला पोहोचतील. त्यानंतर ते प्रयागराज एअरपोर्टवरून डीपीएस हेलिपॅडला जातील. पावणे अकराच्या सुमारासा पंतप्रधान अरेल घाटात पोहोचतील. अरेल घाट येथून महाकुंभ पोहोचण्यासाठी बोटीने जातील.

११ ते साडे अकराच्या दम्यान मोदींचा कार्यक्रम महाकुंभ मेळ्यासाठी आरक्षित आहे. त्यानंतर ते बोटीतून पुन्हा अरेल घाटाला परततील. नंतर डीपीएस हेलिपॅडवरून पुन्हा प्रयागराज एअरपोर्टसाठी रवाना होतील.

Comments
Add Comment