Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले रक्तानी रेखाटलेले चित्र

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले रक्तानी रेखाटलेले चित्र

अहिल्यानगर : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांनी दिलेले विचार महाराष्ट्रातील माणसांच्या मनावर प्रेरित करणारे आहे.त्यांचे विचार घेवुन अनेकांनी राजकीय प्रवार सुरु केला. त्यांचे प्रखर विचार शिवसैनिकांना बळ देत होते.शिवसेना म्हणजे एक विचार.आणि शिवसैनिक म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्त्या ही ओळख संपूर्ण देशभरात होती.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे नसले तरी त्यांची विचारधारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जीवंत ठेवली आहे.अहिल्यानगरचे माजी नगरसेवक शाम नळकांडे यांच्यावतीने चित्रकार गणेश जिंदम यांनी रक्तानी रेखाटलेले चित्र उपममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

School Bus Fares Hike : पालकांच्या खिशाला कात्री! स्कूल बसच्या शुल्कात होणार वाढ

नगरसेवक शाम नळकांडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे,संपर्क प्रमुख दिलीप सातपुते,शहरप्रमुख सचिन जाधव,संभाजी कदम,बाबुशेठ टायरवाले आदि उपस्थित होते.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे चित्र गणेश जिंदम यांनी रेखाटले आहे.त्यांना हे चित्र रेखाटण्यासाठी ३ तास लागले.त्यांनी या अगोदर ही शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवासानिमित्ताने रक्ताने चित्र रेखाटले होते.त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुंबईला बोलावून त्यांचे कौतूक केले होते.गणेश जिंदम यांचे कलाक्षेत्रात मोठ योगदान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -