Friday, May 9, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण

Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक कंटेन्ट क्रिएटर त्यांच्या वेगवेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काही कंटेन्टसाठी, काही गाण्यांसाठी तर काही विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. अशाच एका मराठमोळ्या विनोदवीरावर सोलापूरमध्ये चालू असलेल्या स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर मारलेला जोक प्रणित मोरे या विनोदवीराला चांगलाच महागात पडला. याप्रकरणी प्रणितने शासनाकडे मदत मागितली आहे.



मराठमोळा विनोदवीर महाराष्ट्रीयन भाऊ अशी ओळख असलेल्या प्रणित मोरेचा २ फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या 24K क्राफ्ट ब्रूझ या हॉटेलमध्ये कॉमेडी शो होता. हा शो सायंकाळी ५:४५ वाजता संपला. शो संपल्यानंतर प्रणित चाहत्यांमध्ये फोटो काढण्यास गेला असता समोरून आलेल्या ११-१२ जणांच्या जमावाने त्याच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला केला. यानंतर त्यातील गुंडांनी प्रणितला धमकावले “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” असं म्हणाला.



"महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने ही मारहाण झाली. या हल्ल्याचा खरा सूत्रधार तनवीर शेख आहे. हल्ला झाल्यानंतर माझ्या सहकार्यांनी 24K क्राफ्ट ब्रूझ हॉटेलच्या मॅनेजरकडे cctv फुटेज मागितले असता त्यांनी नकार दर्शवला शिवाय हल्ला झाला त्याक्षणी हॉटेलवर काहीच सुरक्षा नव्हती. एका महाराष्ट्रातील कलाकाराची महाराष्ट्रातच गळचेपी होत असून मला न्याय पाहिजे" असं प्रणितने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Pranit More (@maharashtrianbhau)





कोण आहे वीर पहारिया ?


वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. वीर पहारियाने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

Comments
Add Comment