घाटकोपरमधील झुनझुनवाला परिसरातील ४३ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाच्या वतीने घाटकोपर (पश्चिम) रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते रामरहिम मंत्र मंडळ दरम्यानचे रस्ते व पदपथावरील ४३ अनधिकृत शेड आणि अतिक्रमणांवर मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. त्यामुळे झुनझुनवाला परिसर अतिक्रमण मुक्त झाल्याने या परिसरातील नागरिकांनी तसेच रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.



एन विभागातील घाटकोपर (पश्चिम) रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते रामरहिम मित्र मंडळ या परिसरात अनेक वर्षांपासून असलेला नाईलाजाने देहविक्रय करणाऱ्यांचा परिसर (रेड लाईट एरिया) हटविण्याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर, उप आयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीदरम्यान तोडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार, या परिसरातील रस्ते व पदपथावर असलेले ४३ अतिक्रमण आणि अनधिकृत शेड्सवर कारवाई करून रस्ता व पदपथ मोकळा करण्यात आला. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील

वायू गुणवत्ता मापन प्रणाली न बसणाऱ्या प्रकल्पांची बांधकामे थांबवली

तब्बल १०६ बांधकामांना बजावल्या स्टॉप वर्कची नोटीस मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या

मुलुंड,भांडुपकरांना येत्या मंगळवार आणि बुधवारी करावी लागणार पाणीकपातीचा सामना

ठाणे शहरातील काही भागांचादेखील पाणीपुरवठा राहणार बंद मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुलुंड (पश्चिम) येथील २४००