Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीAI App : “एआय-ऍपचा वापर टाळा”- केंद्रीय अर्थमंत्रालय

AI App : “एआय-ऍपचा वापर टाळा”- केंद्रीय अर्थमंत्रालय

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांनी चॅट-जीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय-ऍपचा वापर टाळावा. यामुळे सरकारच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण होऊ शकतो असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केले आहेत. यासंदर्भात अर्थमंत्रालयाने २९ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन संगणक आणि मोबाईलमध्‍ये चॅट-जीपीटी व डीपसीक अशा प्रकराच्‍या एआय-ऍपचा वापर करु नये. अशा प्रकारचे ऍपच्या वापरामुळे सरकारची महत्त्‍वपूर्ण आणि गोपनीय माहिती उघड होण्‍याचा धोका आहे. त्‍यामुळे चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर टाळावा.

अशा प्रकराच्‍या चॅटबॉट्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाची ही अधिसूचना २९ जानेवारी जारी केली आहे. मात्र तब्‍बल एक आवठड्यानंतर ही सूचना चर्चेत आली आहे. कारण ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारताच्या दौऱ्यावर येत असून ते केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा

चीनचे अल्‍पावधीत लोकप्रिय झालेल्‍या डीपसीकवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या स्वतःच्या पायाभूत मॉडेलसह जागतिक एआय स्‍पर्धेत उतरणार असल्‍याचे सूतोवाच केले होते. भारतात बनवलेले फाउंडेशनल मॉडेल्स जगातील सर्वोत्तम मॉडेल्सशी स्पर्धा करू शकतील.अल्गोरिथमिक कार्यक्षमतेसह आपण हे मॉडेल्स खूपच कमी वेळेत तयार करू शकतो. आपल्याकडे काही महिन्यांतच जागतिक दर्जाचे फाउंडेशनल एआय मॉडेल असेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -