दहावीची परिक्षा झाल्यावर ‘वर्षा’वर जाणार; उलटसूलट चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

  80

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचे आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ. पण इतक्या वेळा सारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटते, माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या या चर्चा सुरू आहेत," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्याबाबत सुरु असलेल्या उलटसूलट चर्चांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देण्यात आली. मात्र सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन महिने होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवावस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरुन राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे म्हटले. मात्र आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.



मीडिया वेड्यांचा बाजार होतोय...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला. मला असे वाटते की, अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत