Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीRailway Accident : एकाच ट्रॅकवर आल्यामुळे दोन मालगाड्यांची जोरदार धडक

Railway Accident : एकाच ट्रॅकवर आल्यामुळे दोन मालगाड्यांची जोरदार धडक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भीषण अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात रेल्वे रुळावर दोन मालगाड्या समोरा समोर येऊन मोठा अपघात झाला आहे. धडक इतकी भीषण होती की इंजिन रेल्वे रूळावरून खाली कोसळले. या अपघातामध्ये चालक आणि को पायलट गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मिळालेल्या माहितीनुसार फतेहपूर जिल्ह्यातील खगा कोटवाली येथील पँबपिपूरजवळ एक मालगाडी सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Ratnagiri : देवरुखमध्ये हातभट्टीवर छापा, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते आहे. अनेक मालवाहतूक गाड्या थांबविल्या गेल्या आहेत. काहींचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात दोन रोको पायलट जखमी असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -