रत्नागिरी : रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. या छाप्यात ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ritesh Genelia Marriage Anniversary : रितेश जेनेलियाच्या लग्नाची भन्नाट गोष्ट ऐकली का?
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पठारवाडी बांबरचा पऱ्या येथे विनापरवाना हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या हातभट्टीवर छापा टाकला. या छाप्यात ३८ हजाराचे ७५० लिटर गूळ व नवसागरमिश्रित उकळते रसायन बॅलरसहित, ५० रुपयांचा चाटू, ५०० रुपयांची अॅल्युमिनियम डेग तसेच २ हजार १०० रुपयांची वीस लिटर गावठी दारू असा सुमारे ४० हजार ६५० रुपयांचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पोलीस याबतीत कशी कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.