
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भीषण अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात रेल्वे रुळावर दोन मालगाड्या समोरा समोर येऊन मोठा अपघात झाला आहे. धडक इतकी भीषण होती की इंजिन रेल्वे रूळावरून खाली कोसळले. या अपघातामध्ये चालक आणि को पायलट गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६ अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल ७४ ४२७. ४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ६०.६५ कोटी रुपये शिलकीच्या ...
मिळालेल्या माहितीनुसार फतेहपूर जिल्ह्यातील खगा कोटवाली येथील पँबपिपूरजवळ एक मालगाडी सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या ...
अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते आहे. अनेक मालवाहतूक गाड्या थांबविल्या गेल्या आहेत. काहींचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात दोन रोको पायलट जखमी असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.