मे पूर्वी कामे पूर्ण होणार असतील त्याच रस्त्याचे खोदकाम करा

  119

रस्ते कामांसाठी आयुक्तांनी घालून दिली संहिता


मुंबई : मुंबईतील (BMC) सुमारे २०५० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे १३३३ किलोमीटर लांबीच्या रस्ते सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे ७५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्क्याचे काम जून २०२५ पूर्ण केले जाणार असून ज्या रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होणार आहेत, तीच कामे हाती घेऊन त्यांचे खोदकाम करण्यात यावे, अन्यथा खोदकाम करू नये अशाप्रकारच्या सूचना महापालिक आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांत स्पष्ट केले.


हरित जागा, सुधारित आरोग्य पायाभूत सुविधा, वाहतूकीच्या उपाययोजना, चालण्यायोग्य पदपथ, अत्याधुनिक वाहतूक व पार्किंग व्यवस्था या उपक्रमांद्वारे शहराच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट करत गगराणी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशांनुसार सर्व डांबरी/पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत, सुमारे १,३३३ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये, उपनगरांमधील आरे रोड, अंधेरी कुर्ला लिंक रोड आणि नारायण दाभोळकर मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, शहीद भगतसिंग मार्गापासून नेव्ही नगरला जोडणारा नानाभाई मुस मार्ग आणि शहर परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.



उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यामध्ये हाती घेण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ कि.मी.) जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आली आहेत. त्यापैकी, अद्यापपर्यंत १८७ रस्त्यांची कामे (सुमारे २६टक्के) पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.


तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ कि.मी.) काँक्रिटीकरण करण्याचे असून त्यापैकी ७२० रस्त्यांची कामे डिसेंबर २०२४ मध्ये सुरु करण्यात आली. रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्याकरिता आय.आय.टी. मुंबई सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या या सुधारणांमुळे रस्त्याच कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ होणे अपेक्षित असून त्यामुळे प्रवास सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



पूर्व द्रुतगती महामार्गावरील संगमस्थान आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील तीन संगमस्थानांची सुधारणा करण्याचे कार्यादेश देण्यात आलेले असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. या द्रुतगती महामार्गाशेजारी वाहनतळ विकसित केली जाणार असून वाहतूक विभागामार्फत पार्किंग अॅप विकसित करण्यात येणार आहे. हे ऍप नागरिकांना आपल्या सोयीनुसार वाहनतळांवरील जागांचे आगाऊ बुकिंग व ऑनलाईनप्रणालीद्वारे त्याचे अधिदानही करु शकतील. या सर्व उपाययोजनांमुळे वाहतूक नियमनात सुधारणा होऊन रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा अंदाज गगराणी यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही