Monday, February 10, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वजिथून निघालो होतो तिथेच परतलो, रतन टाटांच्या तरुण मित्राची भावनिक पोस्ट

जिथून निघालो होतो तिथेच परतलो, रतन टाटांच्या तरुण मित्राची भावनिक पोस्ट

मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा तरुण मित्र शांतनू नायडू याला टाटा समुहातील टाटा मोटर्स या कंपनीत जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्स विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात शांतनू नायडूने (Shantanu Naidu) लिंक्डीनवर (LinkedIn) एक भावनिक पोस्ट केली आहे.

टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना दिली भेट

शांतनू नायडूने २०१४ मध्ये वाहन आणि भटके कुत्रे यांची धडक होऊ नये यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले होते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने अपघात टाळण्यास मदत होत होती, शिवाय भटके कुत्रे कळत नकळत वाहनाला धडकण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत होती. वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने उद्योगपती रतन टाटा आणि शांतनू नायडू यांची ओळख झाली. ही ओळख पुढे मैत्रीत रुपांतरीत झाली. रतन टाटांचा शांतनू नायडूवरील विश्वास वाढू लागला. रतन टाटांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी २०२१ मध्ये Goodfellows नावाचे व्हेंचर सुरू केले होते. यात रतन टाटा यांच्यासह शांतनू नायडूची गुंतवणूक होती. रतन टाटांनी शांतनूला एक शैक्षणिक कर्ज पण दिले होते. काही काळानंतर रतन टाटांनी Goodfellows मधील स्वतःच्या मालकी हक्कांना सोडून दिले. शांतनू नायडूला दिलेले शैक्षमिक कर्जही रतन टाटांनी माफ केले.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय ?

शांतनू नायडूने I Came Upon a Lighthouse या कार्यक्रमात रतन टाटा आणि त्याच्यातील संवाद कसा सुरू झाला आणि मैत्री कशी वृद्धिंगत होत गेली या संदर्भातली माहिती जाहीर केली होती. आता टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाल्यानंतर शांतनूने लिंक्डीनवर (LinkedIn) एक भावनिक पोस्ट केली आहे.

मध्यमवर्गीय, महिला, युवा, बळीराजा आणि उद्योजकांना अच्छे दिन; १२ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त

वडील पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्लू पँट परिधान करुन नियमित टाटा मोटर्समध्ये कामासाठी जायचे. शांतनू दररोज ते कामावरुन परतण्याच्या वेळी त्यांची वाट बघत बसायचा. आता तो स्वतःच टाटा मोटर्समध्ये नोकरी करणार आहे. ही बाब नमूद करत शांतनूने जिथून निघालो होतो तिथेच परतलो अशी एक भावनिक पोस्ट लिंक्डीनवर (LinkedIn) केली आहे.

कोण आहे शांतनू नायडू ?

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून अभियांत्रिकीत पदवी घेतलेल्या शांतनूने २०१६ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए केले. रतन टाटांचा सहकारी म्हणून काम करणाऱ्या शांतनूने पुढे दिवसातील अधिकाधिक वेळ रतन टाटांसोबत घालवण्यास सुरुवात केली. रतन टाटांनी जेव्हा अखेरचा श्वास घेतला त्यावेळी पुढचे काही दिवस शांतनूला स्वतःला सावरण्यासाठी द्यावे लागले. एवढा तो रतन टाटांशी जोडला गेला होता. रतन टाटा हे शांतनूसाठी मार्गदर्शकाच्या स्थानी होते. यामुळे टाटा समहाच्या टाटा मोटर्स कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून संधी मिळाल्यावर शांतनूने लिंक्डीनवर (LinkedIn) एक भावनिक पोस्ट केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -