Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी रेल्वे गाड्या सुसाट; ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी रेल्वे गाड्या सुसाट; ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी पुणे विभागातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि जवळपासच्या रेल्वे स्थानकांसाठी प्रवास केला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १४४ वर्षांतून येणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पुण्यासह देशभरातून जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.



जानेवारी महिन्यात तर दोन शाही स्नानांची तिथी होती. त्यामुळे पुण्यातून बहुसंख्य नागरिक उत्तर प्रदेशातील प्रयागराजकडे निघाले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रेल्वेच्या गाड्या अजूनही फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना ऑनलाईन तिकिटे सध्या उपलब्धच होत नाहीत. यामुळे प्रवासी मिळेल त्या वाहनाने जात आहेत. असे असले तरी रेल्वेच्या पुणे विभागाकडून भाविकांसाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्यांचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच गाड्यांद्वारे रेल्वेच्या पुणे विभागाला जानेवारी २०२५ महिन्यातील अवघ्या वीस दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.

Comments
Add Comment