Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीMhada Lottery : म्हाडा कोकण मंडळ घरांची उद्या सोडत; कुठे पाहता येणार...

Mhada Lottery : म्हाडा कोकण मंडळ घरांची उद्या सोडत; कुठे पाहता येणार रिझल्ट?

मुंबई : शहरात स्वत:च हक्काचं घरं असण्याचं अनेकांच स्वप्न असतं. मात्र घरांच्या वाढत्या किंमती पाहता सर्वसाामान्य नागरिक म्हाडाच्या घरांवर अवलंबून असतात. अलीकडेच मुंबई कोकण मंडळाने २ हजार २६४ घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery) जाहीर केली होती. तर उद्या याबाबत सोडत काढली जाणार आहे.

Rahul Solapurkar : ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचा खळबळजनक दावा!

ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हाडा कोकण मंडळ घरांचा सोडत कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते लॉटरीची सोडत काढली जाणार आहे.

दरम्यान, सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर https://housing.mhada.gov.in/ जाऊन त्यांचे नाव पाहू शकणार आहेत. वेबसाइटवर जाऊन त्यांना अ‍ॅप्लीकेशन नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराला त्याचे नाव लकी ड्रॉसाठी लागलं की नाही हे समजणार आहे. (Mhada Lottery)

कोणत्या भागात घरांचा समावेश?

ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, ओरस, वेंगुर्ला आणि मालवण सारख्या भागात म्हाडा कोकण मंडळ घरांची सोडत असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -