Shivjayanti 2025 : शिवजयंती उत्सवानिमित्त ३ दिवस शिवनेरी येथील वाहतुकीत बदल!

पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?


पुणे : राज्यभरात शिवजयंती (Shivjayanti 2025) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी शोभयात्रेचे आयोजन करण्यात येत असून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशातच येत्या १९ फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्याजवळील (Shivneri Fort) वाहतुकीत काही बदल (Traffic Route Change) केले जाणार आहेत.



किल्ले शिवनेरी येथील शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत जुन्नर शहर व परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.


आदेशानुसार नारायणगाव येथून जुन्नरकडे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा-खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल मार्गाने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड वाहनतळ या ठिकाणी जातील. ताथेड वाहनतळ ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज-सावरगाव-वारुळवाडी-नारायणगाव- घोडेगाव मार्गे जाईल.


गणेशखिंड- बनकफाटा- ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे माध्यमिक शाळा व आसपासच्या परिसरात असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण- अहिल्यानगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे - सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड वाहनतळ येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या