माजी आमदार वैभव नाईक,पत्नी स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस; बे हिशोबी मालमत्तेचा होणार पर्दाफाश

Share

मागील चौकशीला उपस्थित न राहिल्याने नाईक दाम्पत्यांना पुन्हा नोटीस

कणकवली : माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना,पुन्हा त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी कार्यालयात उपस्थित राहावे अशी नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याआधी वैभव नाईक हे आमदार असताना त्यांना चौकशीची नोटीस आली होती. त्यानंतर त्यांच्या कणकवलीतील राहत्या घराची व अन्य मालमत्तांची मोजमाप देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानंतर नाईक यांना पुन्हा नोटीस आली आहे.

वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की,मालमत्तेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी क्रमांक ०१/२०२२ करण्यात येत आहे.सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने आपण ०५ डिसेंबर २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी येथे स्नेहा वैभव नाईक यांच्या सहित उपस्थित राहिले होते. परंतू लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असल्याबाबत सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला होता. उघड चौकशीच्या अनुषंगाने माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे दि.०३ जानेवारी २०२३ रोजी आणि दि. २८ जून २०२३ रोजी उपस्थित रहाणेबाबत त्यांना या कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. मात्र आपण उपस्थित न राहता २८जून २०२३ रोजी आपले अकाउंटंट अमोल पुरुषोत्तम केरकर हे उपस्थित राहिले. परंतू त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपुर्ण नसल्याने ती न देता, काही कालावधी नंतर आपले उपस्थितीत सदरची कादगपत्रे हजर करु असे पत्र त्यांनी या कार्यालयास दिलेले आहे. परंतु त्यानंतर अद्याप आपलेकडून कागदपत्रांबाबत पुर्तता झालेली नाही. अगर आपण उपस्थित राहिले नाहीत.

तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरु असलेल्या उघड चौकशीचे अनुषंगाने आपले स्वतःचे,आपली पत्नी स्नेहा यांचे तसेच एचयुएफ व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती परिपुर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या मालमत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममध्ये भरुन तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट,कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम,शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह आपण दिनांक ११फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय नाचणे रोड, मारुती मंदीर येथे उपस्थित रहावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

5 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

26 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

58 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago