प्रकल्पबाधितांसाठी मुंबईत सुमारे ३५ ते ७० हजार सदनिका

  290

मुंबई(विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या नागरी व पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींसाठी पुरेशा सदनिका उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय परिमंडळाच्या गरजेचा आढावा घेण्यात आला. त्याअनुषंगाने, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ मधील तरतूदीनुसार लँड टिडीआर व बांधकाम टिडीआर तसेच वर्धनक्षम तफावत निधी म्हणून क्रेडीट नोट स्वरूपातील अधिमूल्याच्या मोबदल्यात खाजगी जमिन मालकांकडून प्रत्येक परिमंडळात ५,००० ते १०,००० पुनर्वसन सदनिका बांधून घेण्यात येणार आहे.


प्रभादेवी, भांडुप (प), मुलुंड (पू), जुहू आणि मालाड (पू) येथील एकूण ३२,७८२ प्रकल्पबाधितांसाठी सदनिकांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी, मुलुंड व भाडुप येथील सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर असून प्रभादेवी येथील प्रकल्प आराखड्यांच्या मंजूरीची कार्यवाही सुरू आहे. या पुनर्वसन सदनिका पुढील ३ ते ५ वर्षामध्ये उपलब्ध होतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केली.



आश्रय योजनेचे २५ टक्के काम पूर्ण


सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेतंर्गत विकास करण्यात येत असून कामगार कल्याण योजनेतंर्गत ३० वसाहतींचा विकास करण्यात येत आहे. सफाई कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची म्हणजे ३०० चौरस फुटांची सुमारे १२००० सेवा निवासस्थाने उपलब्ध करण्यात देण्यात येणर आहे. ३० ठिकाणांच्या पुनर्विकासाकरता कार्यादेश देण्यात आले असून त्यापैंकी २३ ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. उर्वरीत ठिकाणची कामे लवकरच सुरु करण्यात येतील. आतापर्यंत या योजनेचे २५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Accident News: वर्सोवा खाडीत तेलाचा टँकर कोसळला, चालकाचा बुडून मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुलाची संरक्षक भिंत तोडून भीषण अपघात भाईंदर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरून

PropEquity : जून-एप्रिल तिमाहीत घरांच्या विक्रीत १९% घट, सर्वाधिक घट ठाणे, मुंबईत!

प्रतिनिधी: प्रॉपइक्विटी(PropEquity) या कंपनीने घरांच्या विक्रीबाबत एक नुकताच अहवार सादर केला आहे. या अहवालातील

एसटी महामंडळ आज श्वेतपत्रिका जाहीर करणार

मुंबई : प्रचंड तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून श्वेतपत्रिका सोमवारी (दि. २३ जून) जाहीर

मंत्री नितेश राणे यांनी केली वर्सोवा जेट्टीची पाहणी

स्थानिक मासेमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नितेश राणे यांची सकारात्मक भूमिका मुंबई : मत्स्य व्यवसाय व

Mumbai Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी ६.३०च्या सुमारास फिल्म सिटीतील

मराठी अभिनेत्री गिरीजा ओकच्या पायाला फ्रॅक्चर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओकने अनेक मराठी मालिका, चित्रपट तसेच रंगभूमीही गाजवली