सोलापूर : चालू गाडीत स्वयंपाक करणे तमिळनाडू येथील चालकाला महागात पडले आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालू ट्रकने पेट घेतला. (Truck burnt on Solapur-Pune National Highway) या आगीमुळे ट्रकसह आतमध्ये असलेले बटाटे जळून खाक झाले.
वाहकाने गाडीमध्ये आग लागण्याचे कारण माहीत नसल्याचे सांगितले, तरी चालू गाडीमध्ये स्वयंपाक करत असल्यामुळेच आग लागल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. महामार्गावर असणाऱ्या कोंडी गावानजीक सुनील हॉटेलसमोर ही घटना घडली.
Solapur City : सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेट कंपनीला ७८४ कोटींचा निधी
ट्रक क्र. टीएन २९, बीझेड ३९११ मध्ये गुजरातमधून बटाटे भरण्यात आले होते. हे बटाटे तमिळनाडू राज्यातील मेटापल्या या ठिकाणी नेले जात होते. आगीमुळे गाडीची समोरील संपूर्ण बाजू जळून खाक झाली. त्याचबरोबर बटाट्याच्या गोण्याही जळाल्या.