मुंबईतले घर विकून सोनाक्षीने कमावले साडेआठ कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील घर विकून साडेआठ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असलेल्या सोनाक्षीने गुंतवणूक म्हणून वांद्रे पश्चिमेला एमजे शाह समुहाच्या एका संकुलात चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया ४६३२ चौरसफूट होता तर कार्पेट एरिया ४२११ चौरसफूट होता.



सोनाक्षी सिन्हाने '८१ - ऑरिएट' (81 Aureate, Bandra West, Mumbai) या ४.४८ एकर परिसरात पसरलेल्या संकुलात एक चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट सोनाक्षीने मार्च २०२० मध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने १४ कोटी रुपयांत खरेदी केला होता. फ्लॅटसाठी सोनाक्षी सिन्हाने ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी अर्थात नोंदणी शुल्क आणि १.३५ कोटी रुपये स्टँप ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क भरले होते. सोनाक्षीने २०२५ मध्ये तिच्या मालकीचा '८१ - ऑरिएट'मधील १४ कोटींचा फ्लॅट २२.५० कोटी रुपयांत विकला. या व्यवहारात सोनाक्षीला साडेआठ कोटी रुपयांचा नफा झाला. रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सने या व्यवहाराच्या नोंदणीची छाननी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने १४ कोटींचा फ्लॅट २२.५० कोटी रुपयांत विकला आणि ६१ टक्के नफा कमावला.



सोनाक्षी प्रमाणेच अनेक श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिक रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत आहेत. फक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कधी करायची आणि विक्री कधी करायची हे समजणे आवश्यक आहे. ज्यांना हे समीकरण समजले त्यांनाच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून नफा कमावणे शक्य आहे.
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात