मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हटले की सर्वात आधी महाबळेश्वर समोर येते. महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक येत असतात. अशातच आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रात एक नवे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे. (New Mahabaleshwar)
Mumbai Crime : मुंबई हादरली! वांद्रे स्टेशनवरील एक्सप्रेस ट्रेनमध्ये कुलीचा महिलेवर बलात्कार
महाबळेश्वर पर्यटनाचे आकर्षणाचे स्थळ असून याठिकाणी नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळे महाबळेश्वर शेजारीच नव्या पर्यटनस्थळाची रचना करण्यात येणार आहे. एमएमआरडीएकडून (MMRDA) ‘नवीन महाबळेश्वर’ या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा,पाटण,जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील २३५ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता आणखी नव्याने २९४ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे. यामध्ये छोटी विमानतळे, सायकल ट्रॅक, रोप वे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी, तसेच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल १२,८०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
‘सी प्लेन’ प्रकल्प उभारणार
नवीन महाबळेश्वरमध्ये तीन व्यावसायिक विमानतळ प्रस्तावित आहेत. यामध्ये बाजे येथे धावपट्टी, तर उरमोडी, तापोळा येथे ‘सी प्लेन’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील बाजे येथे ०.४५ किमी ते दोन किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्यात येणार आहे. बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहजरीत्या पोहोचता येईल. उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे, तसेच ५०० मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळविण्यासाठी ठेवला जाणार आहे, तसेच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरविण्याची सुविधा उभारण्यात येणार आहे. उरमोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामणोली, ठोसेघर, कास पठार आदी भागांत पर्यटकांना काही वेळेतच पोहोचता येणार आहे. (New Mahabaleshwar)