Sunday, May 11, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-२०मध्ये असे करणारा पहिला भारतीय

अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-२०मध्ये असे करणारा पहिला भारतीय

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. २ फेब्रुवारीला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर ४-१ असा कब्जा केला.


वानखेडेच्या टी-२० सामन्यातील विजयाचा हिरो ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने ५४ बॉलवर १३५ धावा लुटल्या.यात त्याने १३ षटकार आणि ७ चौकार लगावले. अभिषेक शर्माने यानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने तीन धावा देत दोन विकेटही मिळवल्या.



अभिषेक शर्मा असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे ज्याने एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकण्यासोबतच विकेटही मिळवल्या. अभिषेक शर्मा भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज आहे. सोबतच अभिषेक भारतासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाजही आहे.


Comments
Add Comment