Tuesday, June 17, 2025

PM Narendra Modi : वसंत पंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!

PM Narendra Modi : वसंत पंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!
मुंबई : दरवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. त्याचप्रमाणे आज वसंत पंचमीमिनित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आहे. या सोहळ्याला हजारो लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) त्यांच्या सोशल माध्यमांवर ट्विट करत सर्वांना वसंत पंचमीच्या (Vasant Panchami) शुभेच्छा दिल्या आहेत.



वसंत पंचमीच्या दिवशी आयोजित या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीला वधू-वराप्रमाणे सजवण्यात आले होते. देवाला मौल्यवान पारंपारिक अलंकार आणि भरजरी पोशाख परिधान करून देवाला सजवण्यात आले आणि दुपारी १२ वाजता हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. विठ्ठल आणि रुक्मिणीच्यामध्ये देव ब्राम्हणांनी अंतरपाठ धरला आणि सात मंगलाष्टकांसगह तांदुळ आणि फुलांचा वर्षाव करत विवाह सपन्न झाला. विवाहानंतर मंदिर समितीच्या वतीने उत्सव मूर्तींची पूजा करण्यात आली. तसेच वऱ्हाडी भाविकांसाठी पंचपक्वनांचा जेवणाचा बेतही ठेवण्यात आला होता. सर्व भक्तांनी या विवाहाचा आनंद लुटला.

Comments
Add Comment