दिल्ली : भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (दि १) रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. बारा लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने प्रत्येक घराघरात ‘लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा’ अशी भावना निर्माण झाली. अशातच आता नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या सभेत काँग्रेसला आणि आम आदमी पक्षाला टोला लगावलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत होणाऱ्या निवडणुक प्रचार सभेत म्हणाले जर नेहरू यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर द्यावं लागत होतं. तर इंदिरा गांधी यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर १० लाख रुपये कर रुपात सरकारला द्यावे लागले असते.दहा ते १२ वर्षांपूर्वी जर तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात १२ लाख रुपये कमावले असते तर तुम्हाला २ लाख ६० हजार रुपये कर भरावा लागला असता.
काँग्रेस सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी कर आकारायची. पण भाजपच्या काळात तुम्हाला १२ लाख रुपयांच्या कमाईवर एकही रुपयाचा टॅक्सही लागणार नाहीये. शनिवारी सादर झालेला बजेट हा गरिबांसाठी होता, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
दरम्यान काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाचं प्रत्येक स्तरावर स्वागत केले जात आहे.