नदीत पाणी सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
पुणे : राज्यभरात एकीकडे गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे ज्या भागात जास्त प्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत. त्या भागातील पाण्याची तपासणी केली जात आहे, अनेक भागात दुषित पाणी आढळून येत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असताना इंद्रायणी नदी मधील पाणी फेसाळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
PM Narendra Modi : वसंत पंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!
शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमचे सावट असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आळंदी मधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळत आहे. इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे आळंदीतील नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाची खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड मधील अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या या इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडतात आणि नदी प्रदूषित करतात मात्र किरकोळ कारवाई करून संबंधित कंपन्यांना अभय दिले जाते आहे. त्यामुळे असे पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही आता १४० वरती पोहचली आहे. यापैकी ७८ रुग्ण पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित २६ रुग्ण पुणे महापालिका, १५ पिंपरी-चिंचवड महापालिका, १० रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या ११ आहे. एकूण रुग्णांपैकी ४५ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत २५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर मृतांची संख्या पाचवरती पोहोचली आहे.