Sunday, May 18, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Big Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा धमाका; पुन्हा दिसणार गुलीगत मॅन!

Big Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा धमाका; पुन्हा दिसणार गुलीगत मॅन!

मुंबई : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) शो नेहमीच चर्चेत असतो. अशातच मागीलवर्षी 'बिग बॉस मराठी सीझन ५' हा सीझन चांगलाच गाजला होता. सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पर्वाचा विजेता ठरला असून अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावकर, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार हे स्पर्धक या शोमधील टॉप ६ स्पर्धक ठरले होते. दरम्यान, या सीझनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठी ५ मधील सर्व पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.



अभिनेता रितेश देशमुखने गेल्यावर्षी 'बिग बॉस मराठी सीझन ५' हा शो होस्ट केला होता. ७० दिवस चाललेला हा सीझन चांगलाच गाजला. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला होता. 'बिग बॉस मराठी सीझन ५'ने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. आता हे पर्व चार महिन्यांनी हे पुन्हा दाखवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


'कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी ५'चा प्रोमो शेअर केला आहे, रितेश देशमुखचा हा प्रोमो सीझन सुरू होण्याआधीही रीलिज करण्यात आलेला. तोच प्रोमो शेअर करत या पर्वाचे पुनःप्रक्षेपण होत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या स्पर्धकांनी घातलेला राडा पुन्हा एकदा चाहत्यांना पाहता येणार आहे. (Big Boss Marathi)



कधीपासून आणि किती वाजता पाहायला येणार शो? 


१० फेब्रुवारीपासून 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचे पुनःप्रक्षेपण पाहता येईल. दररोज दुपारी ३ वाजता 'कलर्स मराठी' वाहिनीवर हे पर्व प्रसारित होणार आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)




Comments
Add Comment