Budget 2025 : यंदाचं बजेट मध्यमवर्गीयांसाठी 'अच्छे दिन' आणणार ?

  120

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी 'अच्छे दिन' आणणार की नाही यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत.



तज्ज्ञांच्या मते, देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी नवी करप्रणाली (Nex Tax Regime) स्वीकारली आहे. यामुळे जुनी करप्रणाली रद्द करुन सर्वांसाठी नवी करप्रणाली लागू केली जाणार का याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पातून जाहीर केला जाईल. आयकरात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाणार की नाही या प्रश्नाचे उत्तर पण यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळेल.



जीएसटी बाबतचे निर्णय जीएसटी काउन्सिलमध्ये होतात. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या काउन्सिलमध्ये देशातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री आहेत. यामुळे जीएसटीबाबत अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणेची शक्यता कमी आहे. पण भारतातील निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, कारखानदारी वाढावी यासाठी काही घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केल्या जाण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्र, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण यासाठी किती निधी दिला जाणार याचे उत्तर अर्थसंकल्पातच मिळेल.

जाहीर झालेल्या सरकारी कार्यक्रमानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्याची प्रक्रिया शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. अर्थसंकल्पाद्वारे नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. मागील चार केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पही पेपरलेस असेल.

अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० या वेळेत नेहमीप्रमाणे त्यांचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवणार आहेत. याआधी १ फेब्रुवारी २०२० आणि २८ फेब्रुवारी २०१५ रोजी शनिवारी अर्थसंकल्प सादर झाले होते. या दोन्ही वेळी पण बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार शनिवार असूनही आर्थिक व्यवहार करत होते.

कुठे थेट पाहता येईल अर्थसंकल्प?



  • केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत, दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या अधिकृत वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल.

  • सरकारच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही अर्थसंकल्प प्रसारित केला जाईल.

  • सीतारामन यांचं केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चं भाषण Prahaar.in वरही पाहता येणार आहे.

  • अर्थसंकल्प www.youtube.com/@PrahaarNewsline या यू ट्युब चॅलवरही बघता येईल.


बजेट २०२५ च्या लाइव्ह अपडेट्स आणखी कुठे मिळतील?



  • अर्थसंकल्पाची कागदी प्रत डिजिटल स्वरूपात केंद्र सरकारच्या www.indiabudget.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध असेल.

  • राज्यघटनेनं विहित केल्याप्रमाणे वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यतः अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाची मागणी (डीजी), वित्त विधेयक इत्यादींसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज ‘केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप’वर उपलब्ध असतील.

  • अर्थसंकल्पाची कागदपत्रं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे