मुंबई : यंदा हिवाळी मोसमाला सुरुवात होताच तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडीने चांगलाच जोर धरला होता. मात्र त्यानंतर सातत्याने वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आता थंडी नाहीशी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने (IMD) फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे गारठा कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. (Weather Update)
US Plane Crash : अमेरिकेत पुन्हा विमान कोसळले! ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग
हवामान विभागाचे महासंचालक यांनी फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये ‘देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या लाटांचा कालावधी कमी होणार असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर देशभरात थंडीच्या लाटांचा कालावधी घटणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या महिन्यात पावसाचा अधिक प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे सामान्यत: अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. (Weather Update)