US Plane Crash : अमेरिकेत पुन्हा विमान कोसळले! ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग

वॉशिंग्टन डी.सी : अमेरिका येथील वॉशिंग्टन डीसीमधील पेनसिल्व्हेनियामध्ये दोन दिवसांपूर्वी विमान कोसळून मोठी घटना घडली होती. (US Plane Crash) अमेरिकेतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत फिलाडेल्फियामध्ये विमान कोसळले आहे. या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांना आग लागली आहे. (Plane Crashes In Philadelphia)



मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून सुमारे ४.८ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. अपघाती विमानात दोन जण प्रवास करत होते. विमान १,६०० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर जवळपास ३० सेकंदांनी हे विमान अनेक घरांवर आदळले. यामुळे अनेक घरांना आग लागली.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही अपघाताचे कारण समोर आले नाही. तसेच या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (US Plane Crash)

Comments
Add Comment

Tariff Bill : भारतावर 100% टॅरिफची टांगती तलवार! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर; रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर मोठी कारवाई

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांवर परिणाम करणारी मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाकडून तेल आणि इतर

School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून...

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधून एका अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेची बातमी समोर आली आहे.

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत