वॉशिंग्टन डी.सी : अमेरिका येथील वॉशिंग्टन डीसीमधील पेनसिल्व्हेनियामध्ये दोन दिवसांपूर्वी विमान कोसळून मोठी घटना घडली होती. (US Plane Crash) अमेरिकेतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत फिलाडेल्फियामध्ये विमान कोसळले आहे. या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांना आग लागली आहे. (Plane Crashes In Philadelphia)
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून सुमारे ४.८ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. अपघाती विमानात दोन जण प्रवास करत होते. विमान १,६०० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर जवळपास ३० सेकंदांनी हे विमान अनेक घरांवर आदळले. यामुळे अनेक घरांना आग लागली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही अपघाताचे कारण समोर आले नाही. तसेच या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (US Plane Crash)
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…