मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिज स्क्विड गेमचा (Squid Game) पार्ट २ नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला. या सीरिजला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून जगभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र या सीझन २चा पुढील भाग कधी प्रदर्शित होणार याची चर्चा सुरु होती. दरम्यान, स्क्विड गेम निर्मात्यांनी स्क्विड गेम ३ ची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Mumbai Metro : मेट्रो २ ब प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात २४८ कोटींची वाढ!
नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर स्क्विड गेम सीझन ३ चा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ‘Prepare For Final Game’ म्हणजेच ‘अंतिम खेळासाठी तयार राहा’ असे कॅप्शन लिहले आहे. त्याचबरोबर २७ जून २०२५ रोजी स्क्विड गेम सीझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे.
‘स्क्विड गेम ३’ चे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता ह्वांग डोंग-ह्युक यांनी एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये ‘ स्क्विड गेम ३ ची बातमी शेअर करण्यासाठी मी हे पत्र लिहिण्यास खूप उत्सुक आहे. या कथेच्या शेवटी नवीन स्क्विड गेम तयार करण्यासाठी लावलेले बीज वाढताना आणि ते फळ घेत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. आम्ही तुमच्यासाठी आणखी एक मनोरंजक मालिका आणण्याचा प्रयत्न करू’, असे म्हटले आहे.
दरम्यान, स्क्विड गेम वेब सीरीजचे दोन सीझन धमाकेदार ठरल्यानंतर आता तिसऱ्या सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram