मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण श्वेता रोहिराचा अपघात झाला आहे. या अपघातात श्वेता गंभीर जखमी झाली आहे. श्वेताने इंन्स्टा पोस्ट करुन अपघाताची माहिती दिली आहे. या इंन्स्टा पोस्टमध्ये श्वेताने स्वतःचे रुग्णालयातील फोटो पण अपलोड केले आहेत. फोटोत श्वेता जखमी दिसत आहे.श्वेताच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे आणि हातालाही गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. अपघातात श्वेताचे ओठ फाटले आहेत.
View this post on Instagram
अपघाताची माहिती सोशल मीडियावर देत श्वेताने ‘लाईफ इज फूल ऑफ सरप्राईज… आहे ना ? #kalhonaho गाणं गात आप दिवसभरासाठी योजना आखत असतो आणि पुढच्या क्षणी सगळं बदलतं. एक बाईक येते आणि माझा दोष नसताना मला उडवून जाते. चालत असलेल्या मला चक्क उडत असल्याचे लक्षात येते. अपघातामुळे आता इथेच पोहोचले आहे…. आयुष्यातला एक हादरवून टाकणारा हा अनुभव आहे…. पण हेच प्रसंग आव्हानात टिकून राहण्याचं आणि आनंदाने जगण्याचे सामर्थ्य मिळवून देण्यासही मदत करत असतात… विनाश हा निर्मितीला प्रशस्त करणारा मार्ग आहे…;’असे इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केले आहे.
श्वेता सलमानची मानलेली बहीण आहे. सलमानने २०१४ मध्ये श्वेताचे अभिनेता पुलकीत सम्राटसोबत थाटात लग्न लावून दिले. पण जेमतेम वर्षभरातच श्वेता आणि पुलकीतचा संसार मोडला. दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर पुलकीतने दुसरे लग्न केले, तर श्वेता अजूनही एकटीच आहे. अशातच अपघातामुळे श्वेताचे आयुष्य पुन्हा एकदा बदलून गेले आहे.