Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Nagpur News : रागवून घर सोडून गेलेल्या चिमुकल्याचा नागपूर पोलिसांनी केला वाढदिवस साजरा

Nagpur News : रागवून घर सोडून गेलेल्या चिमुकल्याचा नागपूर पोलिसांनी केला वाढदिवस साजरा

नागपुर : वाढदिवस म्हटलं की सर्वांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. वाढदिवस साजरा करायला प्रत्येकाला आवडतोच. लहान मुलांसाठी वाढदिवस साजरा करणं ही एक पर्वणी असते. वाढदिवस साजरा नाही झाला तर लहान मुले रुसून बसतात. नागपुरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करायला विरोध केल्याने १० वर्षाच्या मुलाने घर सोडले आहे.

नागपूरात वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आई वडिलांनी वाढदिवस साजरा करायला नकार दिल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात घर सोडल्यानंतर मुलगा घरी दिसत नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरु केली. मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पथकाला मुलगा परिसरातील स्वामी नारायण मंदिरात सापडला. पोलिसांनी तातडीने मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं. मुलाला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी स्वतः केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >