Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेKalyan - Shilphata Road : कल्याण - शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!

Kalyan – Shilphata Road : कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातली अधिसूचना लवकरच प्रसिध्द केली जाईल.

शिवसेना उद्धव ठाकरेंना पुण्यात देणार मोठा धक्का ?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण – शिळफाटा रस्ता निळजे उड्डाणपुलाच्या कामासाठी ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.शिळफाटा रस्त्यावरील सततच्या वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

दिल्ली-जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपिरिया मॉलजवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाखालून जाणार आहे.

पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे:

● कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा.

● शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने जावे.

● बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहनांनी काटई नाका येथे न येता खोणी गावात वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे.

● हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे.

दरम्यान कल्याण – शिळफाटा रस्ता बंद केल्यामुळे पाच दिवस नागरिकांना हाल सोसावे लागणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -