Saturday, February 15, 2025
Homeमहत्वाची बातमीशिवसेना उद्धव ठाकरेंना पुण्यात देणार मोठा धक्का ?

शिवसेना उद्धव ठाकरेंना पुण्यात देणार मोठा धक्का ?

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुण्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंच्या पक्षातून अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे मुंबईत सभा घेऊन स्वबळाची तयारी करत असल्याचे संकेत देत आहेत. पण त्यांच्या पक्षात स्वबळाएवढी ताकद उरणार का ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आदित्य ठाकरेंनी मारली दांडी, शासकीय बैठकीत उद्धव सेनेची कोंडी

पुण्याचे माजी आमदार महादेव बाबर उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून फेब्रुवारी महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेवेळी उद्योगमंत्री उदय सामंत पण उपस्थित होते. यानंतरच पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Budget 2025 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला सादर होणार

महादेव बाबर यांच्यासोबत पुण्यातील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. महादेव बाबर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण महाविकास आघाडीतडून अंतिम क्षणी प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्याने बाबर यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळेच नाराज झालेल्या महादेव बाबर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

आमदार धसांनी ज्यूस पाजला, जरांगेंचे उपोषण स्थगित

अलिकडेच दिल्लीत राहणारे अब्जाधीश अभिषेक वर्मा आणि त्यांच्या पत्नीने शिवसेनेत प्रवेश केला. बरीच वर्षे अभिषेक यांचे आई आणि वडील खासदार होते. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. अभिषेक वर्मा हे शिवसेनेसाठी दिल्लीत राष्ट्रीय समन्वयक (नॅशनल कोऑर्डिनेटर) म्हणून काम करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -