Saturday, October 25, 2025
Happy Diwali

घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीला आग

घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीला आग
मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरच्या पूर्व भागात असलेल्या कैलास प्लाझा इमारतीला आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचे काम तातडीने सुरू केले. मानखुर्द, विक्रोळी आणि चेंबूर परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Comments
Add Comment