Sunday, April 20, 2025
Homeक्राईमबेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला

बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला

पालघर : २० जानेवारीपासून बेपत्ता असलेले पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आज सापडला आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जात असतानाच गाडीच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अशोक धोडींचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामुळे आता या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे.

२० जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. त्यामुळे अशोक धोंडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. तसंच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती.

Delhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

गेल्या १२ दिवसांपासून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीनं पालघर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही स्वतः घटनास्थळी पोहोचले होते.

दरम्यान अशोक धोडी अपहरण प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांच अपहरण केल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -