Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीFire : प्रयागराजमध्ये चाललंय तरी काय? आधी आग, मग चेंगराचेंगरी आता पुन्हा...

Fire : प्रयागराजमध्ये चाललंय तरी काय? आधी आग, मग चेंगराचेंगरी आता पुन्हा आग!

महाकुंभात चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा परिसरात अग्नितांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!

१९ जानेवारीला लागलेल्या आगीत जळाले होते १८० पंडाल

प्रयागराज : महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज भीषण आग (fire) लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर २२ मध्ये ही आग लागली असून या आगीत १५ टेन्ट जळून खाक झाले आहेत.

महाकुंभ नगरीत अग्निशमन कार्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह ४ आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर्स तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ-थर्मल इमेजिंग सारख्या प्रगत प्रणाली आहेत. बहुमजली आणि उंच तंबूंमध्ये आग विझवण्यासाठी याचा वापर केला जातो. एडब्ल्यूटी ३५ मीटर उंचीपर्यंत आग विझवू शकते.

महाकुंभमेळा परिसर अग्निमुक्त करण्यासाठी, येथे ३५० हून अधिक अग्निशमन दल, २००० हून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ, ५० अग्निशमन केंद्रे आणि २० अग्निशमन चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. रिंगण आणि तंबूंमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत. तरीही याठिकाणी आज दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली.

Buldhana News : अरे देवा! केस गळतीनंतर आता बुलढाण्यातील गावक-यांना आता दृष्टीदोष!

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज, गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. छतनाग घाट नागेश्वर घाटच्या सेक्टर २२ मधील आगीच्या घटनेत तंबू जळून खाक झाले आहेत. दरम्यान आग विझवण्यात आली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आज दुपारी एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्‍या जवानांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. आगीच्‍या दुर्घटनेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे महाकुंभ मेळा परिसरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनाचा त्‍यांनी आढावा घेतला. बुधवारी महाकुंभमेळ्यात झालेल्‍या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ६० भाविक जखमी झाले. यातील ३६ जणांवर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू भस्मसात झाले होते. सिलेंडरमधील गळतीमुळे ही दुर्घटना झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -