चेन्नई : श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटका झालेले ६ भारतीय मासेमार आज, गुरुवारी चेन्नईत पोहोचले. विमानतळावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
अलीकडेच, श्रीलंकेच्या नौदलाने १३ मच्छिमारांना पकडले होते. या काळात त्यांच्यावर गोळीबारही झाला, ज्यामध्ये २ मासेमार गंभीर जखमी झाले. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनाही दिल्लीला बोलावण्यात आले. श्रीलंकेच्या नौदल प्रमुखांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले की बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचे सांगितले.
Mumbai Bike Taxi : मुंबईत सुरु होणार बाईक टॅक्सी,परिवहनमंत्र्यांची घोषणा!
जाफना येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी जखमी मासेमारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली होती. आम्ही मच्छीमार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहोत. तसेच मच्छिमारांवर बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत ‘स्वीकारार्ह नसल्याचे भारताना म्हंटले होते. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत भारतीय मासेमारी जहाजाने क्षेत्र सोडण्याच्या सूचनांचे पालन न केल्याच्या संशयावरून नौदलाने ते ताब्यात घेतले होते.