नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ फेब्रुवारीला प्रयागराजच्या महाकुंभमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीला महाकुंभमध्ये स्नानासाठी जाणार नाही आहेत. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीच्या इतर दिवशी महाकुंभमध्ये स्नानासाठी जाऊ शकतात. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तांसाठीचे गर्दीच्या नियोजनाचे तसचे सुरक्षेचे नियम कडक केले आहे. गुरूवारीही महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगम आणि इतर घाटांवर लोकांची मोठी गर्दी जमली होती.
Fire : प्रयागराजमध्ये चाललंय तरी काय? आधी आग, मग चेंगराचेंगरी आता पुन्हा आग!
चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू
प्रयागराज महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भक्तांचा मृत्यू झाला तर ६० जणांचा मृ्त्यू झाला होता. यात काही जणांवर उपचार सुरू आहेत. तर काहीजण जखमी झालेले घरी गेले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.