
मुंबई: दीर्घकाळापासून भारताचा स्पिनर कुलदीप यादव टीम इंडियाचा भाग नाही आहे. मात्र हा गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. खरंतर कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट पास केली आहे. याआधी नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये २६ जानेवारीला कुलदीप यादवची फिटनेस टेस्ट झाली होती.
असे मानले जात आहे की रणजी ट्रॉफीमध्ये कुलदीप यादव उत्तर प्रदेशसाठी शेवटच्या राऊंडमध्ये खेळताना दिसू शकतो. गुरूवारपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये आमनेसामने असतील.
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार कुलदीप?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कुलदीप यादवच्या फिटनेसच्या समस्या असतानाही त्याला संघाचा भाग बनवण्यात आले होते. दरम्यान, आता टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर येत आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियासाठी दिलासा देणारी बातमी येत आहे.

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ...
भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होत आहे. जर कुलदीप यादव इंग्लंड मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग ११चा भाग असेल तर गोलंदाजी आक्रमण निश्चितपणे अधिक मजबूत होईल.