दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोघेही दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत, लाडकी बहीण योजनेबाबत, वाढत्या GBS व्हायरस बद्दल आणि बुलढाण्यातील केस गळती समस्येबाबत अनेक प्रश्न विचारले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी साहित्य संमेलनाबाबत काय म्हणाले?
” मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर देशाच्या राजधानीत होणारं साहित्य संमेलन जगभरातील मराठी माणसांकरिता अभिमानाची बाब आहे. विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल असा माझा विश्वास आहे. या संमेलनासाठी ७० लोकांची टीम कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संमेलनात येण्यासाठी होकार दर्शवला आहे. या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत लागल्यास ती निच्छितपणे देण्यात येईल. हे संमेलन कोण्याएकाच नसून तमाम मराठी बांधवांचं आहे.”
Vaishali Samant : मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेंशन; सरकारने लक्ष द्यायला हवं- वैशाली सामंत
पुढे फडणवीस म्हणाले, “प्रयागराजमध्ये घडलेल्या घटनांचा मी आढावा घेतला आहे. तिथे अडकलेल्या लोकांशी माझं बोलणं झालं असून उत्तर प्रदेशातील सरकारने माझ्याशी समन्वय साधला आहे. धनंजय मुंडे आणि माझी भेट हा योगायोग आहे. आम्ही दोघेही आमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आलो आहोत. धनंजय मुंडे हे आमचे मंत्री आहेत त्यांना भेटायची चोरी नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित दादांची भूमिका ही अधिकृत आहे.पुण्यात उदभवलेल्या वाढत्या GBS व्हायरसचे रुग्ण पहिल्यांदा आढळलेले नाही यापूर्वीही आढळले आहेत. नांदेड भागात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमागे विहिरीतील दूषित पाणी आहे. लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये आढळून आलेल्या अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येईल तसेच त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे याबाबत सक्रिय आहेत.”
Air India Flight : भारत-इस्त्रायल विमानसेवा २ मार्चपासून पूर्ववत होणार
दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यादरम्यान आता पुढे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.