Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीAir India Flight : भारत-इस्त्रायल विमानसेवा २ मार्चपासून पूर्ववत होणार

Air India Flight : भारत-इस्त्रायल विमानसेवा २ मार्चपासून पूर्ववत होणार

नवी दिल्ली : इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्षामुळे ऑगस्ट २०२४ पासून भारत-इस्त्रायल विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता परिस्थिती निवळल्यामुळे या विमानसेवेला पुन्हा सुरुवात करणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. त्यानुसार आगामी २ मार्चपासून तेल अवीवसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत.

DCM Ajit Pawar : मकोका लावताना जातपात बघणार नाही ;अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना खडसावले

यासंदर्भात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून तेल अवीव, इस्रायलला आठवड्यातून ५ उड्डाणे चालवतील. एअरलाइन या मार्गावर त्यांचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान तैनात करेल, ज्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २३८ सीट्स असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी नॉन-स्टॉप उड्डाणे चालविली जातील.

दरम्यान इस्रायलचे पर्यटन मंत्री हैम काट्झ यांनी सांगितले की, आवश्यक मंजुरीनंतर दिल्ली-तेल अवीव मार्गावर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया आणि इस्रायली एअरलाइन ईआय-एआय द्वारे मुंबई ते तेलअवीव थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचे म्हंटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -