Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Nagpur News : प्रियकराच्या फसव्या प्रेमाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Nagpur News : प्रियकराच्या फसव्या प्रेमाला कंटाळून १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका १७ वर्षीय मुलीने ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन संपवले असल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक शोषण करून प्रियकराने फसवल्याने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या आणखी एका प्रेयसीला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.




नागपूरमधील एका १७ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने खोटे सांगत आणखी एका मुलीशी संबंध ठेवले. मृत तरुणीला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांनी मृत तरुणीला प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसी बद्दल समजताच तिने त्याची विचारपूस केली. त्यावेळेस मृत तरुणीच्या प्रियकराने तुझ्यासोबतच लग्न करेन असा दावा केला. काही दिवसांनी मृत तरुणीला तिचा प्रियकर व त्याची प्रेयसी दोघे मिळून तिच्यावर मानसिक दबाव आणू लागले. या सगळ्या गोष्टींना कंटाळून १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. आत्महत्येपूर्वी मृत मुलीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Comments
Add Comment