Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Mahakumbh 2025 : एकीकडे चेंगराचेंगरी तर दुसरीकडे लागली रुग्णवाहिकेला आग; व्हिडिओ व्हायरल

Mahakumbh 2025 : एकीकडे चेंगराचेंगरी तर दुसरीकडे लागली रुग्णवाहिकेला आग; व्हिडिओ व्हायरल

प्रयागराज : उत्तर प्रदेश मधील प्रयागराज महाकुंभमध्ये दुसरे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येनिमित्त गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये जखमींच्या मदतीला धावून आलेल्या रुग्णवाहिकेला चक्क आग लागल्याची बातमी समोर आली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१३ जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येला अमृतस्नानाला करोडो भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे १ च्या दरम्यान अमृतस्नान करण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे आजचे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे. यामध्ये अनेक भाविक जखमी झाले असून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेला आज अचानक आग लागली.

रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये ही आग लागली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान आज घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाकुंभ मेळाव्यासाठी सोडलेल्या विशेष गाडयांना रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >